वरळीच्या बीडीडी चाळ क्रमांक ऐंशी मधील चाळीचा काही भाग सकाळी साडे नऊच्या सुमारास कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. ज्यावेळी चाळीचा काही भाग कोसळला तो सीसीटीव्ही चित्रित झालाय. सध्या बीडीडी पुनर्विकासाचं काम सुरु आहे. मात्र ही इमारत रिकामी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी रहिवासी हे अजूनही राहतायेत.