निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.बीडच्या आष्टीतील शिंदेवाडीत 300 गोणी कांदा पावसामुळे खराब झालाय. महिला शेतकरी सोनाली दरेकर यांनी आपल्या तीन एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती.5 महिन्यांहून अधिक काळ राबून त्यांनी कांद्याची शेती केली. कांदा विक्रीसाठी काढण्याच्या तयारीत असतानाच पावसानं घात केला.वाहून जाणारा कांदा वाचवण्यासाठी त्यांच्या चिमुकलीची धडपड व्हिडिओत कैद झालीये. कांदा विकून मिळणाऱ्या पैशांतून या चिमुकलीनेही छोटी-छोटी स्वप्न पाहिली होती. मात्र आता ही सर्व स्वप्न त्या कांद्यासोबत वाहून गेलीत.