बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सातेफळ येथे विद्युत तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणग्यांमुळे उसाच्या शेताला आग लागली. या भीषण आगीत तब्बल पाच एकरांवरील ऊस जळून खाक झाला. आग विझवण्याचा प्रयत्न करताना शेतकरी संजीवन कांदे हे भाजून जखमी झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.