Jalgaon | गुलाबराव पाटलांनी मला समजवण्याचा प्रयत्न करू नये, Kishor Patil यांचं वक्तव्य

जळगावमध्ये महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला असून आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यातील वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी केली होती. मात्र, यावर आमदार किशोर पाटील यांनी थेट प्रतिक्रिया देत, गुलाबराव पाटील किंवा अन्य कुणीही आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करू नये, असं स्पष्ट केलं आहे. तेवढी अक्कल, बुद्धी आणि क्षमता आमच्यात आहे,' असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनाच ठणकावलं आहे. दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून सुरू झालेल्या या वादामुळे महायुतीमध्ये मोठा वादंग निर्माण शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ