छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडमध्ये एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. केएसके महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने महिनाभरापूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केलीय.या घटनेला एक महिना पूर्ण होतोय. मात्र, आत्महत्या केलेल्या तरुणीचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळतंय. साक्षी कांबळे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर अभिषेक कदम असं आरोपीचे नाव आहे. अभिषेक कदम हा वारंवार ब्लॅकमेल करत होता. आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेतलाय. न्याय मिळत नसल्याने साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केलीय.