ठाकरे गट आणि मनसे एकत्रित निवडणूक लढणाऱ्या बेस्ट पतपेढीची चौकशी होणार आहे. बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीवरील काही सभासदांना सहकार विभागाची नोटीस बजावण्यात आली.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 89 अंतर्गत तपासणीचे आदेश देण्यात आलेत.. यात पतपेढीच्या 2024-25 मधील सर्व आर्थिक व्यवहार आणि कामकाजाची चौकशी करण्यात येणार आहे.या पतपेढीवर गेले नऊ वर्षे ठाकरे गटाची सत्ता होती, या चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती गठित करण्यात आलीय.. या चौकशीसाठी तपासणी अधिकाऱी म्हणून गजानन गायकवाड यांची म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना 29 ऑगस्ट पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.