नांदेड जिल्ह्यामध्ये हिमायतनगर तालुक्यातील जवळगावजवळ एक थार गाडी पुराच्या पाण्यात अडकली. सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हदगाव-हिमायतनगर रस्त्यावरील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गाडीच्या चालकाने पाण्यातून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र जास्त पाणी असल्याने गाडी बंद पडली आणि अडकून पडली.