महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुण्यात डीजे-मुक्त दहीहंडी साजरी केली जात आहे. ही संकल्पना पुनीत बालन ग्रुप आणि भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी आणली. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासोबतच इतर अनेक मंडळांनाही सोबत घेतले. या उपक्रमामुळे दहीहंडी आणि गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांच्या मदतीने साजरा करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे बँड सारख्या पारंपरिक वाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली आहे. तसेच, यामुळे नागरिकांना डीजेच्या मोठ्या आवाजापासून मुक्तता मिळाली आहे. आजचा दहीहंडीचा सोहळा कसा असेल आणि डीजे-मुक्त करण्यामागचे कारण काय, हे जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी.