अहिल्यानगर येथील राहाता तालुक्यातील केलवड-कोहाळे शिवारात एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने पतीनेच स्वतःसह मुलांचा जीव घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण सुनील काळे (वय 35) यांनी त्यांची मुले शिवानी (8), प्रेम (7), वीर (6) आणि कबीर (5) यांना विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.