Latur Rivers | लातूर: 3 नद्या भरल्या, पण मन्याड नदी अजूनही पाण्याविना!

लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तेरणा, तावरजा आणि मांजरा या तीन नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याच जिल्ह्यातील मन्याड नदीच्या पात्रात अद्यापही पुरेसे पाणी आलेले नाही आणि नदीचा तळ पूर्णपणे झाकलेला नाही. यामुळे मन्याड नदी परिसरातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.)

संबंधित व्हिडीओ