वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यांना काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे या हंगामात चौथ्यांदा पुराचा फटका बसला आहे. खंडाळा, शिरपूर, आणि वाघी परिसरातील अडोळ नदीला पूर आल्याने शेतात पाणी शिरून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. याबद्दल वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला