बुलढाणा येथील जिगाव प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या 'जलसमाधी' आंदोलनादरम्यान पूर्णा नदीत उडी घेतलेल्या विनोद पवार यांचा शोध अजूनही सुरू आहे. रस्त्यांच्या मागणीसाठी आदोळ गावातील ग्रामस्थांनी हे आंदोलन केले होते. काल रात्री अंधारामुळे थांबवण्यात आलेले शोधकार्य स्थानिक आपत्ती मदत पथकाने आज सकाळी पुन्हा सुरू केले आहे.