ठाणे आणि मुंबई महापालिका निवडणुकीवरून भाजप नेते गिरीश महाजन आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. राऊत यांनी दोन्ही पालिकांमध्ये विजयाचा दावा केला आहे. यावर पलटवार करत महाजन यांनी 'एकतरी पालिका जिंकून दाखवा' असे आव्हान दिले आहे.