मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, २29 गोविंदा जखमी झाले आहेत. ही घटना मानखुर्द येथे घडली, जिथे जगमोहन शिवकिरण चौधरी (वय 32) नावाचा गोविंदा दहीहंडीची दोरी बांधत असताना पडला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये एकूण 30 गोविंदा जखमी झाले होते, त्यापैकी 15 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.