Bhayander Car Accident|चालक मद्यधुंद अवस्थेत,कारचा भीषण अपघात; रिक्षालाही जोरदार धडक

भाईंदर पूर्व येथील इंद्रलोक फेस ४ परिसरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्यामुळे अपघात झाल्याची घटना समोर आली आहे.अतिशय वेगाने गाडी चालवत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रमेश विहार अपार्टमेंट लगत असलेल्या महानगरपालिकेच्या दिशा दर्शक फलकाला जोरदार धडक दिली.अपघातापूर्वी या कारने एका रिक्षालाही धडक दिल्याची माहिती मिळत आहे.या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने मद्यधुंद कार चालकाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये जमा केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित व्हिडीओ