अलिबाग : रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी कर्जतचे शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर ६५ कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा माणगाव सत्र न्यायालयात दाखल केला आहे....खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेचे मंगेश काळोखे यांची हत्या झाली. तपासादरम्यान थोरवे यांनी तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते....खोपोली नगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसैनिक मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबरला हत्या झाली होती. यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर थोरवे यांनी खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना तटकरे यांना लक्ष्य केले होते. या संदर्भात तटकरे यांनी माणगाव सत्र न्यायालयात थोरवे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा ६५ कोटींचा दावा नुकताच दाखल केला आहे.