जालन्यात जमिनीच्या वादातून सावत्र भावाने चाकू भोसकावून सावत्र भावाचा खून केल्याची घटना घडलीय..जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातल्या वाटुर तांडा येथे दोन दिवसापूर्वी ही घटना घडलीय..या घटनेत भाऊसाहेब राठोड यांचा मृत्यू झालाय तर नवनाथ राठोड गंभीर जखमी झालेत..याप्रकरणी साईनाथ राठोड, संतोष राठोड तसेच इतर सहा आरोपी विरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. दरम्यान आज परतूर पोलिस ठाण्याच्या आवारात मयताच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केला आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मयताच्या नातेवाईकाने केलीय