भाजप आमदार कृष्ण खोपडे यांनी विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी यांच्या कार्यालयावर आक्षेप घेतला आहे. पूर्व नागपूर विधानसभा कार्यालय असा बोर्ड लावल्याने हा निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचा खोपडेंचा आरोप आहे. पोलिसांनी कारवाई केली नसल्याने कार्यकर्त्यांनी बोर्डाला काळा रंग लावून निषेध केला.