हाडमधील संत रोहिदास तरुण विकास मित्र मंडळाने गणेशोत्सवात 'ऑपरेशन सिंदूर' हा देखावा सादर केला. पहलगाम हल्ल्यातील निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईचा हा देखावा होता. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यात आला आहे.