मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मानखुर्द येथे शहरात येणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांच्या वाहनांची विशेष तपासणी करून गाडीचा नंबर आणि चालकाचे नाव लिहून घेतले जात आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे तपासणी अभियान सुरू आहे.