ST महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दणका, CM Fadnavis यांच्या आदेशाची अंमलबजावणी

मंत्रालयात प्रतिनियुक्ती आणि उसनवारी तत्त्वावर अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार एसटी महामंडळाच्या प्रतिनियुक्तीवरील तब्बल २८ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मंत्रालयातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. १० सप्टेंबरपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ विभागात रुजू व्हावे, असे निर्देश देण्यात आले होते. आज मुदतीचा शेवटचा दिवस असल्याने मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना परत मूळ विभागात पाठवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित व्हिडीओ