महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या 4 पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला.महाबळेश्वर-वाई रोडवर कार पसरणी घाटात कोसळून हा अपघात झाला आहे. यात दोघांचा मृत्यू झाला. तर दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.अपघातानंतर ट्रेकर्स आणि स्थानिकांच्या मदतीने कार दरीतून बाहेर काढण्यात आली.यावेळी बचावकार्य करून सर्वांना बाहेर काढण्यात आलं. मात्र त्याआधीच दोघांचा मृत्यू झालेला.सर्व पर्यटक पुण्याच्या लोणीकाळभोरचे असल्याचं समजतंय..