सांगलीच्या इस्लामपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सोन्याच्या चमचावरून चांगलीच जुगलबंदी रंगली. आम्ही पण कष्ट केलेत, असा टोला अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर शेरेबाजी केली.