Thane तील रिक्षा, टॅक्सी चालक संपावर, तर 1 डिसेंबरपासून Baramati मध्ये रिक्षाचालकांचा बेमुदत संप

ठाण्यातील रिक्षाचालक टॅक्सी चालक एक तारखेपासून संपावर. वाढते CNG दर, ऑनलाइन ऍपमुळे कंटाळून हा संप असल्याघे रिक्षा चालकांचे म्हणणे. सप्टेंबर महिन्यात परिवहन मंत्र्यांसोबत बैठक करूज देखील प्रश्न मार्गी न लागल्याने संप करत असल्याचे चालकांचे म्हणणे..CNG दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत, तेल डाळ चे दर मोठ्या प्रमाणात वाढतात मात्र मीटर चे दर फक्त एक रुपयाने वाढतात असे यावेळी चालक म्हणाले. बारामती शहरात सुरू असलेल्या रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेला विरोध करत बारामतीतील रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. बाइक टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी करत संघटनांनी प्रशासनाला निवेदन दिले असून, मागण्यांची पूर्तता न झाल्यास १ डिसेंबर २०२६ पासून बेमुदत रिक्षा बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.बारामती शहरात सुरू असलेल्या रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसाय अडचणीत आला असल्याचा आरोप रिक्षा चालक संघटनांनी केला आहे.

संबंधित व्हिडीओ