रामकुंड परिसरात पाताळेश्वर मंदिराशेजारी पायऱ्यांचे तोडकाम सुरू असतांना पुरातन मंदिर आढळल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. गांधी तलावाजवळ पायऱ्यांच्या खाली महादेवाची पिंड आणि नंदीचे दर्शन घडताच बघ्यांची इथे मोठी गर्दी झाली. पिंडीला फुलं अर्पण करत महादेवाचा जयघोष देखील केला जातो आहे. याच परिसरात आणखी 5 मंदिरं आणि समाधी असण्याची शक्यता नाशिकच्या इतिहासकारांनी व्यक्त केली असून या मंदिरांचे संवर्धन करावे अशी पुरोहित संघ आणि गोदाप्रेमींची मागणी आहे..