छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन DMIC प्रकल्प आला, जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या आगमनाने संपूर्ण बिडकीन पट्ट्यातील शेतजमिनींच्या भावांनी थेट गगनभरारी घेतली. जमिनींचे भाव अचानक तब्बल १० पटीने उसळले. मात्र, आता निसर्गाच्या भीषण दुष्काळी सावटामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आलंय. एकीकडे शेतात पिकं करपली तर दुसरीकडे गुंतवणूकदारही योग्य भाव देत नसल्याची तक्रार आहे.कालपर्यंत कोट्यवधींच्या बोली लागणाऱ्या या जमिनींवर आता फक्त दुष्काळाच्या भेगा पाहायला मिळतायात. याच परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी