छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात शेती आणि रस्त्याच्या वादातून मारहाणीची घटना घडली आहे. नायगाव खंडेवाडी येथे मंत्री अतुल सावे यांचे मोठे बंधू अजित मोरेश्वर सावे आणि पुतणे अमेय अजित सावे यांना एका गटाने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय.