अशोक खरातच्या संपत्तीचे धागेदोरे आता पुण्यापर्यंत पोहोचलेत. पुण्यात अशोक खरातच्या मुलीच्या नावे अलिशान 3 BHK फ्लॅट असल्याची माहिती समोर आलीय. मॉडेल कॉलनीमधील '24 रत्नम' नावाच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये हा फ्लॅट आहे. या घराचा व्यवहार 1 कोटी 20 लाख रुपये देऊन रोख स्वरुपात झाला होता. विशेष म्हणजे अशोक खरातला हे घर खरेदी करण्यासाठी पुण्यातील एका बड्या नेत्याने मदत केल्याची सूत्रांची माहिती आहे. खरातच्या या पुणे कनेक्शनचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी..