छत्तीसगडच्या जगदलपूरमध्ये इंद्रावती नदीच्या पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. नदीची पाणीपातळी तब्बल १२.३९ मीटरवर पोहोचली असून, १९७३ मधील विक्रम मोडला आहे. पुरामुळे शहरातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासन, एसडीआरएफ आणि बचाव पथकांनी आतापर्यंत ८३३ नागरिकांचे रेस्क्यू केले आहे. तर ६५ मदत छावण्यांमध्ये ८ हजार ८९४ नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.दरम्यान, केंद्रीय जल आयोगाच्या इशाऱ्यानुसार आज इंद्रावतीची पाणीपातळी आणखी ६० सेंटीमीटर ते १ मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
Chhattisgarh | Flood havoc in Jagdalpur; Indravati River breaks 50-year record | Flood News