संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा रात्री मोठ्या उत्साहात पार पडली. चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री बारा नंतर लाकडी घोड्याच्या रथावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जगन्नाथ पुरीप्रमाणे इथे सुद्धा हातानं लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री झालेल्या विशेष पूजेनंतर बालाजीच्या उत्सव मूर्तीला लाकडी रथावरती विराजमान करण्यात आलं.