5 हजारांची शेतकऱ्यांना नक्कीच मदत होईल, विरोधकांच्या टीकेला CM Fadnavis यांचं जोरदार प्रत्युत्तर

राज्यात यंदा दुष्काळाची भीषण परिस्थिती असून शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 5 हजार रुपयांच्या मदतीवरुन विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जातेय. यावर फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.शेतकऱ्यांचं दुख मोठं आहे. याची कल्पना आहे, मात्र या 5 हजारांची शेतकऱ्यांना मदत होईल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलंय. आम्ही लाडक्या बहिणींना जेव्हा दीड हजार रुपये दिले तेव्हा हेच काँग्रेसवाले विरोधी पक्षाचे नेते होते ते नाव ठेवत होते. मात्र, लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाची व्हॅल्यू माहिती होती, तसेच त्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची किंमत माहिती आहे अस फडणवीस म्हणालेत

संबंधित व्हिडीओ