सोयाबीन उत्पादकांसाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळाल्याची माहिती राज्याच्या पणन विभागाने नाकारली आहे. नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानं हजारो शेतकरी चिंतेत सापडलेत. तर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा सोडून आत्तापर्यंत सोयाबीन खरेदीला तीन वेळा मुदतवाढ दिल्याचं सांगून हात झटकले. त्यामुळे परिवर्तन शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.