Ashok Kharat आणि पत्नी कल्पना खरात विरोधात गुन्हा; खरातच्या कार्यालयातून महत्त्वाचे पुरावे जप्त

भोंदूबाबा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम आणखी वाढलाय.न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. रकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून, एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे.नाशिकमधील स्वयंघोषित बाबा अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक हादरवणारी माहिती समोर आली. एसआयटीकडून अशोक खरातच्या कार्यलयात तपास केला.

संबंधित व्हिडीओ