कुणाल कामरा विधानभवनात दाखल झालाय.विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराची सुनावणी असल्याने कामरा आज विधान भवनात पोहोचला.उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाण्याप्रकरणी कुणाल कामरावर हक्कभंग दाखल करण्यात आलाय. त्याप्रकरणी ही सुनावणी सुरू आहे.आज सुनावणीदरम्यान त्याच्या टीशर्टने लक्ष वेधून घेतलंय. बुरा नही हूं मै, बस सबको अच्छा नही लगता, असं त्याने त्याच्या टीशर्टवर लिहिलंय...