Europe मध्ये सुपरमार्केटमधील फ्रिजवर Cyber ​​Attack,फ्रिजच्या सेटिंग्ज बदलल्यानं अन्नाची मोठी नासाडी

फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केट्सच्या रेफ्रिजरेशन सिस्टिमवर सोमवारी मोठा सायबरहल्ला झाला. असेच प्रकार उर्वरित युरोपमध्येही घडल्या आहेत. फ्रान्समध्ये सायबर हल्ल्यामुळे ४८० हून अधिक दुकानांमधील फ्रिज आणि फ्रीजरचे तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. फ्रेंच मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅकर्सनी अनेक स्टोअर्सच्या रेफ्रिजरेशन सिस्टिमला डीफ्रॉस्टिंग मोडमध्ये टाकले. त्यामुळे ताजे आणि गोठवलेले अन्न खराब झाले. अनेक स्टोअर्समध्ये आगही लागली. फ्रान्समधील मोठ्या रिटेल कंपन्यांनी हा आतापर्यंतचा अशा प्रकारचा पहिला आणि अत्यंत गंभीर हल्ला असल्याचे म्हटले. याप्रकरणी फ्रान्सचे पंतप्रधान सेबास्टियन लेकोर्नू यांनी राष्ट्रीय सायबरसुरक्षा संस्था ANSSI ला तपासाचे आदेश दिले आहेत. फ्रान्स इतर युरोपीय देशांसोबत मिळून तेथील आणखी कंपन्या प्रभावित झाल्या आहेत का, याचाही तपास करत आहे. संपूर्ण फ्रान्समधील अनेक मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या इंटरनेटशी जोडलेल्या फ्रिजना लक्ष्य करण्यात आले.फ्रान्स व्यतिरिक्त, बेल्जियम आणि लक्झेंबर्गमधील सुपरमार्केट्सनाही अशाच प्रकारच्या सायबर सुरक्षेच्या समस्येचा फटका बसला आहे. तर काही वृत्तांनुसार जर्मनीमध्येही असे प्रकार घडले आहेत.

संबंधित व्हिडीओ