Dadar Kabutar Khana | मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दादर पोलिसांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना दादर पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. दादर इथला कबूतर खाना कायमस्वरूपी बंद झाला पाहिजे तसेच दादर कबूतर खाना इथे आंदोलन करून न्यायालयाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीला घेऊन मराठी एकीकरण समितीच्या वतीने उद्या पोलिसांना निवेदन दिले जाणार आहे. तसेच या मागणीला घेऊन मराठीकरण समितीचे कार्यकर्ते उद्या सकाळी दादर कबुतराखाना येथे जमणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ