मांस विक्री बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास मांस विक्रेत्यांसोबत केडीएमसी मुख्यालयाबाहेर मांस विक्री करु, असा इशारा काँग्रेसनं केडीएमसी प्रशासनाला दिलाय. कल्याण-डोंबिवलीत मांसविक्री बंदीचा निर्णय कायम आहे. 15 ऑगस्टला चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.तर विरोधकांसह नागरिकांनीही निर्णयाला विरोध दर्शवलाय. कुठलाही निर्णय नसताना पालिकेकडून आदेश जारी कऱण्यात आल्याचा आरोप होतोय.