छत्रपती संभाजीनगरचा सराईत गुंड सय्यद फैजल उर्फ तेजाचा आणखी एक कारनामा समोर आलाय.जामिनावर बाहेर येताच तेजाच्या जंगी स्वागताचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. 17 गुन्हे दाखल असलेल्या तेजाचं जेलबाहेर त्याच्या साथीदारांनी हार घालून जंगी स्वागत केलं.. दुसरीकडे तेजाच्या साथीदाराचा न्यायालयात सिगारेट पितानाचा फोटोही समोर आलाय.हातात बेड्या असताना चक्क न्यायालयात सिगारेट पीत असल्याचा हा फोटो तेजाच्या साथीदाराचा आहे.काल पोलिसांसमोरच माज दाखवल्याचा तेजाचा व्हिडिओही समोर आला होता, अशा सराईत गुन्हेगारांचे लाड पुरवणाऱ्या पोलिसांवर कारवाई कशी होत नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.त्यामुळे छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आता बिहारला देखील मागे टाकले असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.