वर्ध्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.आर्वीमध्ये नाल्यांना पूर आला आहे. निम्न वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात येणार आहे.आर्वी परिसरामध्ये पावसाने थैमान घातलं आहे. दुसरीकडे मान्सूनच्या वाऱ्याची तीव्रता वाढली.विदर्भात पुढील 5 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. येणाऱ्या तीन दिवसांसाठी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट,तर मराठवाड्याला ऑरेंज अलर्ट आणि विदर्भाला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला. पुणे हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी.सानप यांनी ही माहिती दिलीय.