MNS Meeting| गुरुवारी मनसेच्या दोन महत्त्वाच्या बैठका, कोणासोबत असणार या बैठका; जाणून घ्या अपडेट्स

उद्या सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील मनसेच्या शाखाध्यक्ष,उपशाखाध्यक्ष, गट अध्यक्ष यांच्यासोबत बैठक पार पडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होईल. एम आय जी क्लब वांद्रे इथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित बैठक होणार आहे.. उद्या संध्याकाळी 4 वाजता शिरोडकर हायस्कूल इथं ही बैठक होणार आहे. बेस्टच्या निवडणुकीत उत्कर्ष पॅनल म्हणून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत.. यासाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.. त्याचपार्श्वभूमीवर उद्या बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार कर्मचारी सेनेची एकत्रित बैठक आहे..

संबंधित व्हिडीओ