कल्याण-डोंबिवलीत मांसविक्री बंदीचा निर्णय कायम आहे.15 ऑगस्टला चिकन मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. तर विरोधकांसह नागरिकांनीही निर्णयाला विरोध दर्शवलाय. कुठलाही निर्णय नसताना पालिकेकडून आदेश जारी कऱण्यात आल्याचा आरोप होतोय. मांसविक्रीच्या फतव्याची कल्याण डोंबिवली पालिकेला अतिघाई.पालिकेकडून अधिसूचनेवर थेट 2026चा उल्लेख केला आहे. मनसेच्या राजू पाटील यांनी पालिकेवर टीका केली आहे.