औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.. या प्रकरणात सरकारमधील एका मंत्र्यांच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. त्याचबरोबर मंत्री नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही पटोलेंनी केलीय.. तसेच मुख्यमंत्री गांधारीसारखे पट्टी बांधून बसल्याची टीकाही त्यांनी केली..