Pandharpur News l विठ्ठल दर्शनाआधी मराठा आंदोलकांनी मंत्री Sanjay Savkare यांना अडवलं

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान मराठा समाजाने त्यांना विठ्ठल दर्शनापूर्वीच अडवलं. जरांगे पाटील यांच्या उपोषणाबाबत आणि मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी मंत्री सावकारे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या मुख्यमंत्री सोडवतील, अशी भूमिका मांडली. Pandharpur News Maratha protesters intercepted Minister Sanjay Savkare before he could visit the Vitthal temple.

संबंधित व्हिडीओ