पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतलं तरी नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण सुरूच आहे. आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत. दरम्यान, आज दुपारी मंत्री अशोक उईके पुन्हा नाशिकमध्ये दाखल होणार असून, विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. यापूर्वी झालेल्या दोन तासांच्या चर्चेतून तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे आजच्या चर्चेतून काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ सप्टेंबरला आदिवासी आयुक्त कार्यालयावर मोर्चा’चा इशारा आंदोलकांनी दिलाय.
Nashik News Tribal students' hunger strike continues; warning issued of a march to the Tribal Commissioner's office on September 1.