र्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यावर देशाची लोकशाही तडफडत आहे. तीन-चार वर्षे झाली, कधी आपला प्राण सोडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्या लोकशाहीच्या तोंडात वेळेत न्यायाचे पाणी टाकले नाही तर देशाची लोकशाही मरेल. खंडपीठ कोणतेही असले तरी त्यामध्ये आपण लक्ष घालावे, असे आवाहन सरन्यायाधीशांना करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत खंत व्यक्त केली.