#dhananjaymunde #chhaganbhujbal राज्याच्या राजकारणात सध्या एका सरकारी बंगल्यावरून नवीन चर्चा सुरू झाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन साडेचार महिने उलटले तरी, त्यांनी मुंबईतील 'सातपुडा' हा शासकीय बंगला अद्याप रिकामा केलेला नाही. त्यामुळे, नवीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना आपल्या अधिकृत निवासासाठी 'सातपुडा' बंगल्यात प्रवेश करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.