ण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांनी छळ केल्याचा आरोप करत, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर, आमदार रोहित पवार आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी पहाटेपर्यंत पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. मात्र, पोलिसांनी अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.