#sanjayraut #shivsenaubt #nishikantdube शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "निशिकांत दुबे यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही," असे म्हणत राऊत यांनी दुबे यांच्या विधानांना फारसे गांभीर्याने न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. दुबे यांनी मराठी माणूस आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय वादानंतर राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.