धुळे शहरातील एमआयडीसी परिसरात एका बंद गोडाऊनच्या भिंतीआड मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली आहे. कुजलेल्या अवस्थेतील हा मृतदेह अंदाजे 40 वर्षीय पुरुषाचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या काही वस्तूंमुळे ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. धुळेच्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिलायन्स मेट्रो कंपनीच्या गोडाऊनमागे आणि ओमश्री कंपनीच्या बंद गोडाऊनजवळ हा मानवी सांगाडा आढळून आला.
स्थानिकांना दुर्गंधी आल्याने परिसराची पाहणी करण्यात आली असता हा प्रकार उघडकीस आला. प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह अंदाजे 40 वर्षांच्या पुरुषाचा असावा असा अंदाज आहे.