Nashik | दुष्काळाचे 5 हजार जमा होत नसल्याचा आरोप, ठाकरे गटाचं नांदगाव तहसील कार्यालयावर आंदोलन

दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेले पाच हजार रुपयांचे अनुदान अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. दिवाळीपूर्वी हे अनुदान देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दिवाळी उलटूनही अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.5 हजार रुपये अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे या मागणीसाठी नांदगाव तालुका शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले..शासन व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली..शासन व प्रशासन दुष्काळात शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.दरम्यान, दुष्काळाची रक्कम त्वरित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा यावेळी शिवसेने ( उबाठा ) तर्फे देण्यात आला..

संबंधित व्हिडीओ